ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरव

May 10, 2015 12:54 PM0 commentsViews:

dadasaheb

10  मे : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते आज ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी कपूर कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. तसेच बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री रेखा, वहिदा रहमान, हेमामालिनी, आशा भोसले, जावेद अख्तर, राज बब्बर यांसारखे दिग्गज उपस्थित होते.

कपूर कुटुंबाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे. या सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे शशी कपूर यांचा नातू आणि बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर याच्या आवाजातली खास डॉक्युमेंट्रीही दाखवण्यात आली.

शशी कपूर यांना मानाचा समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मार्चमध्ये जाहीर करण्यात आला होता. दिल्लीत 3 मे रोजी 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला, पण शशी कपूर यांची अस्वस्थामुळं जाता आलं नाही. त्यामुळे आज कपूर कुटुंबियांच्या पृथ्वी थिएटरमध्ये पुरस्कार देवून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close