दागिने लुटून महिलेची हत्या

October 27, 2009 11:41 AM0 commentsViews:

27 ऑक्टोबर भर सकाळी एका महिलेच्या अंगावरील दागिने लुटून हत्या करण्यात आल्याची घटना मुंबईत घडली. काळचौकी भागात पहाटे मॉर्निंगवॉकला गेलेल्या महिलेवर 2 मोटर सायकल स्वारांनी चाकून हल्ला करून तिच्या अंगावरील दागिने चोरूले. या हल्ल्यात बिना डेढिया या महिलेचा जागीच मृत्यु झाला. त्यावेळी बिना यांचे पतीही सोबत होते. बिना डेढिया आणि त्यांच्या पतीनं चोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण बिना डेढिया यांच्यावर चोरट्यांनी चाकूनं हल्ल केल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. बिना यांच्या पतीला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close