फेरमतदानाची चांदूरकरांची मागणी

October 27, 2009 11:45 AM0 commentsViews: 2

27 ऑक्टोबर बांद्रा-पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार जनार्दन चांदूरकर यांनी त्यांच्या मतदारसंघातली निवडणूक रद्द करावी आणि फेरमतदान घ्यावं अशी मागणी केली आहे. यासाठी ते हायकोर्टात केस दाखल करणार आहेत. मतदानाच्या दिवशी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्याला बेकायदेशीररीत्या स्थानबद्ध केलं अशी त्यांची तक्रार आहे. त्यावेळी पोलीस उपस्थित होते. पण तरीही ते आपल्याला सोडवू शकले नाहीत. त्याचा परिणाम मतदानावर झाला आणि आपण पराभूत झालो, असा आरोप चांदूरकरांनी केलाय. तसंच विरोधी पक्षाच्या उमेदवारानं बोगस मतदान केल्याचाही आरोप चांदूरकरांनी केला आहे.

close