मुंबईत पाणीकपात होण्याची शक्यता

October 27, 2009 1:28 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर गुरूवारपासून मुंबईत 30 टक्के पाणीकपात होण्याची कपात होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत 15 टक्के पाणीकपात सुरू आहे, त्यात आता आणखी 15 टक्क्यांची वाढ होईल. बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या भातसा, तानसा, मोडक सागर, वैतरणा आणि मध्य वैतरणा या धरणांमध्ये पाणीसाठी कमी असल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. दरम्यान महापालिकेने पाण्याच्या प्रश्नावर जनता दरबार घेण्याचं ठरवलं आहे. गुरूवारी अंधेरी पूर्व इथल्या महापालिकेच्या ऑफिसमध्ये हा जनता दरबार भवण्यात येणार आहे.

close