गुगलवरही मदर्स डे सेलिब्रेशन!

May 10, 2015 3:18 PM0 commentsViews:

googledoodle_650x400_7143120335710  मे : संपूर्ण जगभरात आज ‘मदर्स डे’ मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने गुगलने देखील एक खास ऍनिमेटेड डुडल बनवलं आहे. यात जनावरांपासून ते माणसांपर्यंतच्या आई-मुलाचं प्रेम दाखवलं आहे.

डुडलमध्ये गुगलच्या दुसर्‍या ‘O’ या ‘ओ’ अक्षरातून एक बदक तयार होते आणि ते आपल्या पिल्लाला पंखात सामावून घेते. त्यानंतर जंगली प्राणी, ससा असा प्रवास करत शेवटी एक लहान मुलं पळत आपल्या आईकडे येते. गुगलच्या या काही सेकंदाच्या डुडलमधूनही आई-मुलाचे निखळ नाते उत्तमपणे दाखवलं आहे.

संयुक्त राष्ट्राने 1914 साली ‘वर्ल्ड मदर्स डे’ साजरा करायला सुरूवात केली. यंदाचं हे 101वं वर्ष आपण साजरा करत आहोत. भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडामध्ये गुगल आपल्या डुडलच्या माध्यमातून मदर्स डे साजरा करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close