ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसर्‍या वनडे साठी भारतीय टीम सज्ज

October 27, 2009 1:30 PM0 commentsViews: 1

27 ऑक्टोबर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बुधवारी नागपूरमध्ये दुसरी वन डे रंगणार आहे. या डे नाईट मॅचसाठी नागपूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हि मॅच नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. या मॅचसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम्स सोमवारी नागपूरमध्ये दाखल झाल्या. मंळवारीया दोन्ही टीमनं जोरदार सराव केला. या मॅचसाठी भारताचा स्टार ऑलराऊंडर युवराज सिंग पूर्णपणे फिट असल्याचं कॅप्टन महेंद्र सिंग धोणीनं स्पष्ट केल आहे. इतकंच नाही तर युवराज असल्यानं बॉलिंगचे प्रश्नही सुटतील असं मत धोणीनं व्यक्त केलं.

close