आघाडीची खातेवाटपासाठी संयुक्त बैठक

October 28, 2009 8:40 AM0 commentsViews: 1

28 ऑक्टोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची जागावाटपासाठी बुधवारी संयुक्त बैठक होत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी ए.के. ऍन्टोनी, अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचं समजतं. अशोक चव्हाणही बुधवारी संध्याकाळी या बैठकीत सहभागी होतील. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या नेत्यांची निवड झाली असली, तरी अजूनही आघाडीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. 99 चा फॉर्म्युला मान्य नसेल तर काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देऊ, असं राष्ट्रवादीनं जाहीर केलं आहे. पण गृह आणि उर्जा खात्याची मागणी करणार्‍या काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे कुठलाही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. असं जरी असलं तरी खाते वाटप आणि जागावाटपाच्या चर्चा अगदी प्राधान्यानं होत आहेत.

close