गतिमंद पृथ्वीचं आयुष्य घडवणार्‍या आईला सलाम!

May 10, 2015 9:24 PM0 commentsViews:

 गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड

10  मे : चेहर्‍यावरचं निरागस हास्य आणि तितकाच सुमधूर आवाज… हा आहे पृथ्वी इंगळे… पृथ्वीला जन्मजात विल्यम सिंड्रोम आहे आणि त्यामुळे तो गतिमंद आहे, असं कुणाला सांगितलं तर कदाचित विश्वासही बसणार नाही… या आजारातून त्याला बाहेर काढलं त्याच्या आईने… पृथ्वीच्या जन्मानंतरचं पहिलं वर्ष इंगळे कुटुंबाला कठीण गेलं. जन्मत: गतिमंद असणार्‍या मुलांचा सांभाळ करणं हे मोठं आव्हान असतं. पण, पिंपरी चिंचवडमध्ये राहणार्‍या दया इंगळे यांनी खचून न जाता म्युझिक थेरपीच्या मदतीने त्यांनी आपल्या मुलाला एक सामान्य आयुष्य दिलंय. त्यासाठी दया इंगळे यांनी आधी स्वत: संगीताचे धडे गिरवले. त्यानतंर पृथ्वीची बहिण पूर्वाही संगीत शिकली. आज अकरा वर्षांचा पृथ्वी 25 राग गाऊ शकतो, अनेक वाद्यंही वाजवू शकतो. त्याच्या कुटुंबीयांनाच नाही तर पृथ्वीला ओळखणार्‍या प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे. याचं खरं श्रेय जातं ते पृथ्वीच्या आईला… जिने खचून न जाता हिम्मत ठेवली आणि आज तिच्याच प्रयत्नांनी पृथ्वी एक सामान्य आयुष्य जगतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close