केरळात 1 जूनला धडकणार मान्सून!

May 11, 2015 9:09 AM0 commentsViews:

avkali rain43411  मे : येत्या 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मात्र अल निनोमुळे या वर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी हाईल. कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊनच सरकारला पावलं उचलावी लागणार आहेत. त्यामुळे सरकारला पीक विमा आणि आपत्कालीन योजना जाहीर कराव्या लागतील, असं सूतोवाच हवामान विभागाच्या अधिकार्‍याने केलं आहे.

अर्थात मान्सून वेळेवर येत असला तरी तो यावेळी दमदार बरसणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी खाते आपत्कालीन योजना तयार करत आहे. कमी पावसामुळे खरिपाच्या पिकांवर परिणाम होणार नाही, याची काळजीही घेतली जात आहे.

मान्सून 1 जूनला येईल, त्यात 2-3 दिवसांचा फरक पडू शकतो असं स्कायमेटच्या मुख्य अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. पण सध्याच्या परिस्थितीनुसार पावसाला विलंब होणार नाही, पण मान्सूनला एल निनोचा फटका बसणार असून पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. नैऋत्य मान्सून हा खरिपाच्या भात पिकासाठी महत्त्वाचा असतो, त्यामुळे कमी पाऊस झाल्यास भाताच्या पिकास फटका बसण्याची शक्यता आहे.

पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचं जरी जाहीर केलं असलं, तरी 15 मे रोजी दिला जाणारा सुधारित अंदाज महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आता सगळ्याचं या सुधारित अंदाजाकडे लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close