सत्य साईबाबांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री पुण्यात

October 28, 2009 9:11 AM0 commentsViews: 7

28 ऑक्टोबर सत्य साईबाबा यांचं बुधवारी पुण्यात आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी स्वत: मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. तसंच शिवराज पाटील, जयंत पाटीलही पुणे एअरपोर्टवर हजर होते. मुख्यमंत्री सत्य साईबाबांचे भक्त आहेत. नुकतंच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी झालेली निवड आणि निवडणुकीत मिळालेलं यश त्यातच मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सत्य साईबाबांचा आशिवार्द घेण्यासाठी आले. यावेळी सत्य साईबाबांचे भक्त आणि स्वयंसेवकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे एअरपोर्टला जत्रेचं स्वरुप आलं होतं. पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाडशी येथील टेकडीवर सत्यसाईबाबांच निवासस्थान आणि विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी ते पुण्यात आले आहेत. तीन दिवसांच्या दौर्‍यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन,आर्या अंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांच्या गाण्यंाचा कार्यक्रमही होणार आहे.

close