गृहमंत्र्यांची अशीही ‘कीर्ती’, केलं बारचं उद्घाटन

May 11, 2015 1:52 PM0 commentsViews:

11  मे : राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी रात्री चक्क एका बारचं उद्घाटन केलं. पुणे-नगर रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या कीर्ती फॅमिली रेस्टॉरंट आणि परमीट रूमचं शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार सुधीर तांबे, यांच्यासह नगर जिल्हय़ातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कीर्ती हॉटेल मालकाने हॉटेल सुरू करण्यासाठी शासनाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. आणि फॅमिली रेस्टॉरंट आहे. त्यामुळे या हॉटेलचे उद्घाटन करण्यात गैर काहीच नाही, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. दीपक केसरकर यांनीसुद्धा असंच मत व्यक्त केले आहे. पण राज्यात एकीकडे दारूबंदीसाठी महिला आणि नागरिक रस्त्यावर उतरत असताना राज्याच्या गृहराज्यमंत्र्यानेच एका बारचे उद्घाटन करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी गृहराज्यमंत्री शिंदेंवर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close