ऑपरेशन ग्रीन हंट सुरु

October 28, 2009 9:17 AM0 commentsViews: 4

28 ऑक्टोबर छत्तीसगड आणि महाराष्ट्रातल्या नक्षलग्रस्त भागात केंद्राच्या ऑपरेशन ग्रीन हंटला सुरुवात झाली आहे. रात्रीच्या पेट्रोलिंगसहित नक्षली लपलेल्या ठिकाणी छापे घालून धडक कृती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या लाहिरी, धानोरा, भामरागड या भागात प्रामुख्याने ही कारवाई केंदि्रत करण्यात येत आहे. केंद्राकडून ही कारवाई करण्यात येत असली, तरी त्यासाठी राज्याचं सहकार्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. आधीच या मोहिमेला आठवडाभर उशीर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांवर हल्ले केले होते.

close