मुंबईकरांच्या खिश्याला कात्री, टॅक्सी-रिक्षाचा प्रवास 1 रुपयाने महागणार

May 11, 2015 7:55 PM0 commentsViews:

auto taxi11 मे : मुंबईकरांच्या खिश्याला आता आणखी कात्री बसणार आहे. मुंबई आणि महानगर परिसरात रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. रिक्षा – टॅक्सीच्या किमान भाड्यात 1 रुपयाने वाढ करण्यात आलीये. 1 जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ऑथॉरिटीची आज बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. दरवाढीसंदर्भात हकीम समितीनं दिलेल्या फॉर्मुल्यानुसार ही दरवाढ निश्चित करण्यात आली आहे. या फॉर्मुल्यात वर्षभरात इंधनाच्या दरात झालेली वाढ, वाहनांच्या देखभालीचा खर्च, कर आणि विम्याच्या या गोष्टींचा विचार केला जातो. प्रवासी संघटनांनी मात्र या दरवाढीला विरोध केला होता.  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close