आता बोला !, विनाहेल्मेट 134 पोलिसांकडून दंड वसूल

May 11, 2015 5:30 PM0 commentsViews:

thane police11 मे : हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस तुमच्याकडून दंड आकारतात पण जर तुम्हाला हेल्मेट घाला असं सांगणारे पोलीसच जर हेल्मेट घालत नसेल तर…आणि तेही थोडे थोडके नाहीतर तब्बल 8 महिने पोलिसांनी हेल्मेटच घातलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. हेल्मेट न घालणार्‍या 134 पोलिसांवर वाहतूक शाखेनं दंडात्मक कारवाई सुद्धा केलीये अशी माहिती ठाण्यातील दक्ष नागरिक यांना वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्त पी.व्ही.मठाधिकारी यांनी दिली आहे.

दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे असा नियम आहे. तेव्हा,वाहतुकीचे सर्व नियम पोलिसांनाही लागू असताना पोलिसांकडून फारशी त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी पोलिसांनीही दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे यासाठी 2 वर्ष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी खास परिपत्रक जारी करून हेल्मेट न घालणार्‍या पोलिसांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार,व्ही.रविशंकर यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती घेतली असता 1 ऑगस्ट 2014 पासून 31 मार्च 2015 या 8 महिन्यांच्या कालावधीत हेल्मेट न घालणार्‍या 134 पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. या पुढे देखील ठाणे वाहतूक शाखा सर्वसामान्य नागरिकांसोबत वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या पोलिसांवरही कारवाई करणार असल्याचं पी.व्ही.मठाधिकारी यांनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close