काळबादेवी आगीत शहिदांच्या कुटुंबियांपैकी एकाला पालिकेत नोकरी

May 11, 2015 8:13 PM0 commentsViews:

kalbadevi fire sanjay rane and mahendra desai11 मे : मुंबईतील काळबादेवी आगीमध्ये शहीद झालेल्या अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांना मुंबई महानगरपालिका मदतीचा हात दिलाय.पालिकेतर्फे कुटुंबीयांपैकी एकाला पालिकेत नोकरी दिली जाणार आहे. तसंच मुलांच्या शिक्षणाचा खर्चही पालिका उचलणार आहे. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीही माहिती दिली. या आगीत संजय राणे आणि महेंद्र देसाई शहीद झाले.

शनिवारी दुपारी काळाबादेवी येथील 33 गोकुळ निवास इमारतीला आग लागली होती. लाकडी इमारत असल्यामुळे आगीने अग्नीतांडव मांडलं होतं. आग अटोक्यात आणण्यासाठी संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन्ही अधिकारी काम करत होते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने इमारतीचा काही भाग कोसळला आणि त्या ढिगार्‍याखाली अडकले गेल. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना जवळच्याच जी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राणे आणि देसाई यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. महापालिकेनं दोन दिवसांनंतर मदतीची घोषणा केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close