‘गाढवाचे आभार’

May 11, 2015 9:52 PM0 commentsViews:

11 मे :  मेक्सिको येथील एका लहानशा गावानं कामगार दिनाच्या निमित्तानं शेकडो गाढवांचं प्रदर्शन भरवलं होतं. वेगवेगळ्या रंगढंगात आणि  वेशभूषा करून गाढवांना या प्रदर्शनात आणलं होतं. मेक्सिकोमधल्या ओटुंबा भागातल्या लोकांचं जीवन शेतीवरच अवलंबून आहे. इथल्या शेतकर्‍यांना गाढवासारखा कष्टाळू प्राणी मदत करतो. त्या मदतीबद्दल गाढवांचे आभार मानण्याची प्रथा इथे 1965 मध्ये सुरू झाली. आपल्याकडे बैलपोळ्याला आपण बैलांची पूजा करतो तशीच ही प्रथा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close