पेशावरमध्ये बॉम्बस्फोटात 70 जण ठार

October 28, 2009 10:47 AM0 commentsViews:

28 ऑक्टोबर पाकिस्तान पेशावरमधल्या मार्केटमध्ये झालेल्या बाँबस्फोटात 70 जण मृत्युमुखी पडलेत. तर 170 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. पेशावरमधल्या गजबजलेल्या पीपल बाजारपेठेत कारबॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत आजूबाजूच्या अनेक इमारतींचं नुकसान झालं. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या पाकिस्तान भेटीच्या वेळीच हा स्फोट झाला आहे. काळातला हा पाकिस्तानमधला सर्वात मोठा बॉम्बस्फोट आहे. स्फोटाने आजूबाजूची दुकानं पडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

close