गवळी म्हणतो,’दाऊद भित्रा असून तो भारतात येणार नाही’

May 11, 2015 11:25 PM0 commentsViews:

gawali on dawood11 मे : दाऊद भित्रा आहे, तो जेलमध्ये जाण्यास घाबरतो, आपल्या शत्रूंची त्याला भीती वाटते अशी वल्गना केलीये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने. एकेकाळी अरूण गवळी आणि दाऊद हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यांच्यात गँगवॉरही झाला होता. आज दाऊदला भारतात आणण्यासाठी पोकळघोषणा दिल्या जात आहे. पण,अरूण गवळीने, दाऊद भित्रा असून भारतात येणार नाही असा अनुभवी दावा केलाय.

1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा सूत्रधार आणि मुख्यआरोप दाऊद इब्राहिम भारताच्या मोस्ट वाँन्टेड लिस्टवर आहे. पण, दाऊदचा ठावठिकाणाच लागत नाहीये. अलीकडेच दाऊद शरण येणार होता, दाऊदला पकडून आणू अशा बातम्याही झळकल्यात. दाऊद पाकिस्तानातच आहे असे दावेही करण्यात आले. पण, दाऊद अद्यापही भारताच्या रडारवर आला नाही. एके काळी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि दाऊदचे गँगवॉर झाले होते. सध्या गवळी जामसांडेकर खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. तो सध्या पॅरोलवर बाहेर आलाय. त्याच्याशी आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता आपल्या अनुभवाने दाऊदची खिल्ली तर उडवलीच त्याची येण्याची शक्यताही नाकारली.

अरूण गवळी म्हणतो,”दाऊद हा पाकिस्तानमध्ये आहे. हे सगळ्यांना माहित आहे. फक्त त्याला प्रसिद्धी देण्यासाठी अधूनमधून हे सगळं चाललेलं असतं. दाऊद भित्रा आहे, जेलमध्ये जाण्यास घाबरतो, आपल्या शत्रूंची त्याला भीती वाटते. एवढंच नाहीतर आपल्या जवळच्या माणसांवरही तो विश्वास ठेवत नाही. तो दुबईमार्गे पाकिस्तान जाऊन लपलाय. त्याला माहिती आहे, जर आपण भारतात आलो तर आपल्याला फाशीची शिक्षा होईल आणि तुरुंगवास होईल. त्यामुळे तो काही भारतात येणार नाही. कारण याकूब मेननला फाशीची शिक्षा झाली होती तीच भीती दाऊदला आहे.”

दरम्यान, आज दाऊद इब्राहिमच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन केलं. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. याबाबत पाकिस्तानला वारंवार पुरावे दिलेत. पण पाकिस्तान त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याचं राजनाथ म्हणाले. आणि कोणत्याही परिस्थितीत दाऊदला सरकार भारतात आणेलच, असा निर्धार व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close