मुंबईत 30- 31 ऑक्टोबरला काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद

October 28, 2009 10:49 AM0 commentsViews: 3

28 ऑक्टोबर पाईपलाईन दुरूस्तीसाठी मुंबईतल्या काही ठिकाणी 30 आणि 31 ऑक्टोबरला पाणी पुरवठा होणार नसल्याचं महापालिकेनं जाहीर केलं आहे. चोवीस तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वेरावली इथं पाईपलाीनच्या दुरूस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं 30 ऑक्टोबरला सकाळी दहा ते 31 ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे वांद्रे पूर्व-पश्चिम, जोगेश्वरी पूर्व-पश्चिम आणि बिंबीसार नगर विरवानी कॉम्प्लेक्स, ओडीसी या भागात पाणी पुरवठा होणार नाही. तर ट्रॉम्बे इथेही पाईपलाईन दुरस्तीसाठी सह्याद्रीनगर, गणेशनगर या भागात पन्नास टक्के पाणी पुरवठा होणार आहे. तर पांजरापूर इथंही दुरस्तीचं काम होणार असल्याने मुंबई शहर आणि उनगरात वांद्रे पूर्व-पश्चिम ते जोगेश्वरी आणि ट्रॉम्बे भाग वगळता इतर भागात पंचवीस टक्के पाणी कपात होणार आहे.

close