कोलकात्याजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट; 18 जखमी

May 12, 2015 10:23 AM0 commentsViews:

blast5.jpg12 मे : कोलकातामधल्या बराकपूर इथे लोकल ट्रेनमध्ये आज मंगळवारी पहाटे बॉम्बस्फोट झाला. ही ट्रेन सियालदाह इथून कृष्णानगरला जात होती. या स्फोटात किमान 18 जण जखमी झाले असून यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजते. गावठी बॉम्बच्या मदतीने हे स्फोट घडवल्याचा अंदाज आहे.

लोकलमध्ये दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर एका गटाने गावठी बॉम्ब फेकल्यामुळे चालत्या लोकलमध्ये स्फोट झाला. त्यात 18 प्रवासी जखमी झाले. बॉम्बस्फोटानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close