नेपाळमध्ये मृतांची संख्या 64 वर

May 12, 2015 10:50 PM0 commentsViews:

nepal eartq12may

12 मे : विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यातून सावरणार्‍या नेपाळला आज (मंगळवारी) पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा हादरा बसलाय. आज दुपारी 12.35 वाजता नेपाळसह संपूर्ण उत्तर भारताला  भूकंपाचे तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 7.4 इतकी नोंदली गेली. काठमांडू आणि माऊंट एव्हरेस्टच्यामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. नेपाळमध्ये आजच्या या भूकंपामुळे मृतांची संख्या 68 वर पोहचली असून १२०० जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करतण्यात येत आहे. तर बिहारमध्ये १6 जणांचा मृत्यू झालाय.

नेपाळपाठोपाठ उत्तर आणि ईशान्य भारतही हादरला. दिल्ली, नॉयड , कोलकाता, लखनौ, अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये झटके जाणवले. आतापर्यंत तरी कुठेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. भूकंपाचे झटके जाणवल्यावर दिल्ली आणि इतर शहरांमध्ये नागरिक इमारतींच्या बाहेर पडू लागले. सुप्रीम कोर्टाचं कामकाजही काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं.  दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर रिश्टर स्केलवर 5 ते 6 तीव्रतेचे जवळपास 6 धक्के नेपाळमध्ये जाणवले. या भूकंपामुळे नेपाळमधल्या सिंधूपलक चौक परिसरात दरडीही कोसळल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close