‘कॅग’च्या अहवालात गडकरींचे नाव नाही – अरुण जेटली

May 12, 2015 2:30 PM0 commentsViews:

jaithaley in rajhyasabha

12 मे : ‘पूर्ती’ गैरव्यवहार प्रकरणावरून आज सलग दुसर्‍या दिवशी राज्यसभेत गदारोळ बघयाला मिळाला. ‘कॅग’च्या अहवालात नितीन गडकरींचं नाव नाही. काँग्रेसला काही विधेयक पास होऊ द्यायची नाहीत, म्हणून ते गोंधळ घालत आहेत, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (मंगळवारी) राज्यसभेत केला.

‘पूर्ती’ गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधकांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यसभेत काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातला आणि राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. पण ‘कॅग’च्या अहवालात गडकरींचं नावं नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत अरूण जेटली यांनी नितिन गडकरींची पाठराखण केली आहे.

दरम्यान, गडकरींच्या पूर्ती उद्योग समुहावर आरोप करण्यापूर्वी काँग्रेसने आपल्या कार्यकाळातील घोटाळयांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close