दीड तासांत 8 भूकंपाचे हादरे

May 12, 2015 5:14 PM0 commentsViews:

nepal eart345234512 मे : आज पुन्हा एकदा देवभूमी अर्थात नेपाळ भूकंपाच्या धक्क्याने हादरली. 7.4 तीव्रतेचा भूकंपाने नेपाळसह आशिया खंडाला हादरा दिलाय. उत्तर भारतात बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह राज्यातील इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 12.38 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर दीड तासांत तब्बल आठ भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाच्या धक्क्याने एकच धावपळ उडाली. लोकांनी घरं, ऑफिसेस खाली करून मोकळ्या जागेचा आसरा घेतलाय. दिल्लीतील एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले. आज आलेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय तर हजारो जण जखमी झाले आहे. भारतात 8 लोकांचा मृत्यू झालाय. जखमींना हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. काठमांडूमध्ये पुन्हा एकदा 25 एप्रिलच्या भूकंपानंतर नागरीक भयभीत झाले आहे. या भूकंपाची तीव्रता 7.4 इतकी नोंदवली गेलीये. भूकंपाचे केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेवर कोडारी इथं जमिनीखाली 19 किमीवर खोल आहे. नेपाळमध्ये चार वेळा हादरे जानवले. तर अफगानिस्तानमध्ये याची तीव्रता 6.9, चीन मध्ये 5.4 आणि इंडोनेशियामध्ये 5.1 तीव्रतेची नोंद झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close