भूकंपाच्या हादर्‍यात बिहारमध्ये 16 जणांचा मृत्यू

May 12, 2015 5:42 PM0 commentsViews:

bihar earthquak12 मे : एका मोठ्या भूकंपानंतर तब्बल दोन आठवड्यांनी नेपाळ पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं हादरलंय. भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतात आसाम, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. तर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशाही काही ठिकाणी धक्के जाणवले. या भूकंपात बिहारमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. छपरा जिल्ह्यात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक ठिकाणी इमारतींना तडे गेले. पश्चिम बंगालमध्येही जवळपास दहा जण जखमी झालेत.

नेपाळमध्ये आज दुपारी 12.35 वाजता आलेल्या या भूकंपात नेपाळमध्ये 68 जणांचा मृत्यू झालाय. तर एक हजारांहून जास्त जण जखमी झालेत. नेपाळला भूकंपाचे जवळपास 7 धक्के जाणवले. काठमांडूजवळ असलेल्या कोदरीजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर रिश्टर स्केलवर 5 ते 6 तीव्रतेचे जवळपास 6 धक्के नेपाळमध्ये जाणवले. या भूकंपामुळे नेपाळमधल्या सिंधूपलक चौक परिसरात दरडीही कोसळल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close