…जर भूकंप आला तर हे करा, हे करू नका !

May 12, 2015 4:44 PM0 commentsViews:

earthquake tips12 मे : निसर्गापुढे कुणाचं काही चालत नाही…भूकंपासारखं संकट काही क्षणात होत्याचं नव्हतं करून जातं. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा बळी गेला. आज पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला. भारताच्या राष्ट्रीय आपत्ती विभागाने सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. तसंच जर भूकंप आला तर काय करावं काय करू नये यासाठी काही सुचना केल्या आहेत.

1) तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये असाल तर एखाद्या मजबूत टेबल, बेड खाली आसरा घ्यावा.

जर टेबल नसेल तर आपला चेहरा आणि डोकं हाताने झाकून घ्यावं आणि इमारतीच्या कोपर्‍यात गुडघ्यावर बसावं.

2) जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर झाड, वीज खांब, तारापासून दूर राहावं.

3) इमारतीतून बाहेर पडत असताना लिफ्टचा उपयोग टाळावा, पायर्‍याचा वापर करावा.

4) जर तुम्ही कार चालवत असाल तर शक्य तितक्या लवकर कार थांबवावी आणि कारमध्येच बसून राहावं

5) आपली कार उड्डाणपूल, ब्रीज, इमारतीच्या बाजूला उभी करू नये.

6) आपण जर ढिगाराखाली दबले गेला असला तर माचिस, लायटर पेटवू नये.तसंच कोणतीही वस्तू हटवण्याचा प्रयत्न करू नये.

7) ढिगाराखाली अडकल्यावर एखाद्या पाईप अथवा भिंतीवर थाप मारत राहावी, जेणे करून बचावपथकाला तुमचं ठिकाण कळू शकेल.

जर तुमच्याकडे शिट्टी असेल तर ती वाजवावी. जर कोणताही पर्याय नसेल तर जोरात मदतीसाठी हाक मारावी.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close