युतीनं मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती – अजित पवार

October 29, 2009 8:50 AM0 commentsViews: 5

29 ऑक्टोबर युतीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. या अजित पवारांच्या गोप्यस्फोटावर युतीच्या नेत्यानी शिक्कामोर्तब केला आहे. आयबीएन-लोकमतला मिळालेलल्या माहितीनुसार अजित पवार यांची दिल्लीत, विनोद तावडे, सुरेशदादा जैन शेकपचे जयंत पाटील यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार पवारांना ही ऑफर देण्यात आली. पण त्यांनी ही ऑफर नाकारली. छगन भुजबळांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यावर अजितदादा पवार हे कित्येक तास नॉट रिचेबल होते. अजित दादांशी संपर्क होत नव्हता. त्या काळात युतीच्या नेत्यांनी आपली भेट घेतली आणि आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट अजित दादांनी केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्वाचे नेते आहेत. ते स्वप्नातही दुसरा कुठलाही विचार करु शकत नाही असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी मात्र या बातम्यांच खंडन केलं आहे. शिवसेनेनं अशी कुठलीही ऑफर दिली नव्हती असा दावा त्यांनी केला आहे. तर अजीत पवार राष्ट्रवादीचे सगळे आमदार घेउन शिवसेने-भाजपकडे आले तर आम्हाला काही हरकत नाही. असं मनोहर जोशींनी म्हटलं आहे.

close