‘त्या’ इमारतीतल्या सोन्याच्या शोधासाठी ढिगार्‍यावर डल्ला

May 12, 2015 9:22 PM0 commentsViews:

kalbadevi43412 मे : मुंबईतील काळबादेवी इथं दोन दिवसांपूर्वी गोकूळ निवासमधील इमारतीला आग लागली होती. आताही आग विझली आहे. पण, ‘मड्यावरचं लोणी’ खाण्यासाठी चोर आता डोळा ठेवून आहे.

त्याचं कारण असं की, याच बिल्डिंगच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनवणारे गाळे होते. भीषण आगीत ही इमारत पूर्णपणे कोसळली.त्यामुळे हे चारही गाळे आता ढिगार झाले आहे. ढिगार उपासण्याचं काम सुरू आहे. पण, ढिगारातून सोनं लुटण्यासाठी झुंबड उडालीये.

या इमारतीच्या ढिगार्‍याखाली सोनं शोधण्यासाठी अज्ञात व्यक्ती प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घटनास्थळी पोलीस सुरक्षा 24 तास ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील हिरे व्यापार्‍यांचं माहेर घरं असलेल्या झवेरी बाजार आणि काळाबादेवीचा परिसर लागूनच आहे. झवेरी बाजारमध्ये 2012 साली बॉम्बस्फोट झाला होता तेव्हाही असाच प्रकार घडला होता. दोन दिवस पोलिसांनी संपूर्ण परिसर बंद करून ठेवला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close