खातेवाटपाचा घोळ सुरूच

October 29, 2009 11:14 AM0 commentsViews: 2

29 ऑक्टोबर काँग्रेस-राष्ट्रवादीतला खातेवाटपाचा घोळ सोडवण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण दिल्लीत दाखल झालेत. मात्र त्यातून काही मार्ग निघेल याची शक्यता कमी आहे. गुरूवारी जर मार्ग निघाला तरच शुक्रवारी शपथविधी होऊ शकतो. शुक्रवारी जर शपथविधी झालाच तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांचा शपथविधी होईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळली आहे. दरम्यान अजित पवारांनी युतीनं आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करून राष्ट्रवादीने एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर करायला सुरुवात केली आहे.

close