संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

May 13, 2015 10:42 AM0 commentsViews:

parliament of india general

13 मे : विरोक्षी पक्षांच्या प्रखर विरोधासमोर नमते घेत केंद्रातील मोदी सरकारने जीएसटी आणि भूसंपादन विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आज संसदेतील बजेट अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून अल्पवयीन गुन्हेगारांसंबंधीच्या महत्त्वपूर्ण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यसभेत काळ्या पैशांचं विधेयकही मांडलं जाण्याची शक्यता आहे.

देशव्यापी एकसमान कर आकारणी करणारा जीएसटी विधेयक, भूसंपादन विधेयक असे काही महत्त्वाचे विधेयक यंदाच्या बजेट अधिवेशनात मंजूर होणं मोदी सरकारसाठी गरजेचं होतं. पण विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यासमोर मोदी सरकारचे मनसुबे पूर्ण होऊ शकलेले नाही.

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भूसंपादन विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवले गेले आहेत. यात समितीत लोकसभेचे 20 तर राज्यसभेतील 10 खासदार आहेत. ही समिती या विधेयकाचा अभ्यास करेल. या विधायकामध्ये मोदी सरकारने केलेल्या बदलांना काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे, कॅगच्या अहवालात पूर्तीवर ताशेरे ओढले गेल्याने नितीन गडकरीही गोत्यात आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी मागणी लावून धरली आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close