शिवसेना खासदारांचा पंतप्रधान कार्यालयाबाहेर गोंधळ

May 13, 2015 3:31 PM0 commentsViews:

sena_pm_office13 मे : शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत नाही म्हणून शिवसेनेच्या खासदारांनी आज (बुधवारी) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला.

जैतापूर प्रकल्पाच्या मुद्द्यावर गेल्या 13 दिवसांपासून शिवसेनेचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागत होते. पण भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून टाळाटाळ होत होती. त्यामुळे त्यामुळे आज शिवसेनेचे खासदार संतापले आणि त्यांनी पंतप्रधान कार्यालयासमोर बसूनच आंदोलन करू, असा इशारा दिला. अखेर संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर शिवसेना खासदारांना दुपारी 3:30 ची वेळ मिळालीये. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. सेनेचा विरोध पंतप्रधानांच्या कानावर घालणार असं सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close