कॉमनवेल्थ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु

October 29, 2009 11:32 AM0 commentsViews: 6

29 ऑक्टोबर 2010च्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा काऊंटडाऊन आता सुरु झाला. गुरूवारी लंडनमध्ये बॅटन रिलेला सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि सीनिअर खेळाडू लंडनमध्ये दाखल झालेत. ऑलिम्पिक गोल्ड विजेता अभिनव बिंद्रा, ब्राँझ मेडल विजेता विजेंदर कुमार, टेनिस स्टार सनिया मिर्झा यासारखे खेळाडू रिलेत सहभागी होणार आहेत. इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ अधिकृतपणे ही बॅटन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हवाली करतील. यानंतर अभिनव बिंद्रा, सानिया मिर्झा आणि इतर काही आंतरराष्ट्रीय खेळाडू बॅटन बकिंगहॅम पॅलेसमधून बाहेर आणतील. त्यानंतर सुरु होईल 2010च्या दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेचा प्रवास. 3 ऑक्टोबर 2010 पासून दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात हाणार आहे.

close