भले शाब्बास, अंध सतीशने सुरू केलं पहिलं रेडिअो अॅप !

May 13, 2015 5:08 PM0 commentsViews:

satish navaleगोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड

13 मे : अंध व्यक्तींसाठी आवाज हेच जग समजून घेण्याच महत्वपूर्ण साधन आहे, हीच बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड परिसरातील एका अंध तरुणाने ब्रेलवाणी हे रेडिओ स्टेशन सुरू करण्याचं बघितलेलं स्वप्न, प्रत्यक्षात उतरवलं आहे. अंधांसाठी आणि अंधांद्वारे, मोबाईल ऍपस्‌च्या माध्यमातून चालवलं जाणार हे पहिलच रेडिओ स्टेशन असणार आहे. सतीश नवले या तरुणानं हे रेडिओ स्टेशन सुरू केलंय. आवाजाच्या माध्यमातून अंधाना त्यांच हक्काच व्यासपीठ मिळवून द्यायच, आणि त्यासाठी रेडिओ स्टेशनच निर्माण करण्याचं सतीशने बघितलेल हे स्वप्न, तब्बल 17 वर्षानंतर सत्यात उतरलंय.

नमस्कार श्रोतेहो ….आपण ऐकत आहात…अंधांच्या दुनियेतील मनाला भिडणारा हा आवाज आहे सतीश नवले या तरुणाचा…मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर ऑडिओ बुक लिहणारा सतीश जगातील पहिला अंध लेखक म्हणून ओळखला जातो आणि आता त्याही पुढे जाऊन सतीशने अंधांसाठी हे एक रेडिओ स्टेशन सुरू केलंय. अर्थातच हे रेडिओ केंद्र सुरू करण्याची प्रेरणाही त्याला सचिनकडूनच मिळाल्याचं तो नम्रपणे नमूद करतो

आवाजाच्या माध्यमातून अंधांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ निर्माण करुन द्यायचं आणि त्यासाठी रेडिओ स्टेशनच निर्माण करण्याचं सतीश ने बघितलेल हे स्वप्न, आज तब्बल 17 वर्षांनंतर सत्यात उतरतंय आणि त्यासाठी त्याला मदत होतीय ते प्राईम टेलीकास्ट या संस्थेची. प्राईम टेलीकास्ट या यूके स्थिर संस्थेच्या प्रक्षेपित होणार्‍या या रेडिओ केंद्रावर महाराष्ट्रातील घडामोडी आणि मनोरंजन करण्यासह प्रक्षेपणाची धुरा सतीशचं सांभाळणार आहे.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रेडिओ स्टेशन चालणार आहे एका मोबाईल ऍपद्वारे, अंधासाठी सहज हाताळता येईल अशी या ऍपची डिझाइन केली गेलीय,त्या शिवाय डोळसही या ऍपचा उपयोग करू शकतात. ऍपद्वारे रेडिओ स्टेशन चालवणं हे भन्नाट तर आहेच मात्र जगात असा प्रयोग पहिल्यांदाचं होत असल्यामुळे तो दखल पात्रही आहे. अंध असतानाही सतीशने घेतलेली भरारी ही डोळसांना ही लाजणारी अशीच आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close