स्पेशल रिपोर्ट : स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची मागणी पण…

May 13, 2015 8:13 PM0 commentsViews:

 प्रवीण मुधोळकर, नागपूर

13 मे :  बौद्ध धर्मियांसाठी स्वतंत्र विवाह कायद्याची मागणी सध्या जोर धरत आहे. या कायद्यासंदर्भात तज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. नेमका हा वाद काय आहे यासंदर्भातला हा विशेष वृतांत…..

14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर समाजातील लग्न बौद्ध पद्धतीने लागतात. मात्र बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा नसल्यामुळे, हे लग्न, हिंदू मॅरेज ऍक्टनूसारच ग्राह्य धरले जातात. अनेकदा आंतरजातीय लग्नाचे वाद कोर्टात गेले. तेव्हा या विवाहांना कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहेत. या सर्व प्रकारामुळे अखेर स्वतंत्र कायद्याची मागणी पुढ आलीये.

indian wedingबौद्ध धर्म विवाह आणि वारसाहक्क कायदा 2007 चा ड्राफ्ट तयार करुन तो राज्याच्या सामाजिक न्याय खात्याकडे सादर करण्यात आला आहे. बौद्ध धर्मियांसाठी स्वतंत्र बौद्ध कायदा करण्याची मागणी होत आहे. 1956 नंतर आतापर्यंत बौद्ध पद्धतीने झालेले सर्व विवाह वैध मानले गेले पाहिजे अशी मागणी जोर धरतेय. मात्र, या कायद्याची खरंच गरज आहे का यावरही अनेक तज्ञांमध्ये तीव्र मतभेद आहेत.दुसरीकडे काही तज्ञांच्या मते हा बौद्ध धर्मीयांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी या कायद्याची गरज आहे.

आघाडी सरकारच्या काळात बौद्ध विवाह कायदा तयार करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मात्र, कायद्याचा ड्राफ्ट अजूनही धुळखात पडलेला आहे. देशात सर्व धर्मीयांसाठी वेगळे विवाह कायदे आहेत, मग बौध्दांसाठी का नाही असा सवाल माजीमंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केलाय.

युती सरकारनं या संदर्भात एक समिती स्थापन केली आहे. मात्र सध्या तरी या कायद्यावरुन आंबेडकरी समाजात एक मोठी चर्चा रंगली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close