मेळघाटात एका महिन्यात 81 बालमृत्यू

October 29, 2009 11:55 AM0 commentsViews: 115

29 ऑक्टोबर मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात 81 बालकांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. मेळघाटात तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी सोय आणि बालमृत्यूला जबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. सप्टेंबर महिन्यातल्या आकडेवारीनुसार 119 बालकं कुपोषणाच्या तिसर्‍या आणि चौथ्या श्रेणीत आहेत. सप्टेंबर महिन्यात धारणी तालुक्यात 54 तर चिखलदरा तालुक्यात 27 बालकांचा मृत्यू झाला. ही बालकं कुपोषणाच्या तिसर्‍या आणि चौथ्या श्रेणीमध्ये होती. मेळघाटात, धारणी येथे उपजिल्हा रुग्णालय, चिखलदरा, चुर्णी येथे ग्रामीण रुग्णालय तर 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत अमरावती जिल्हयाला 18 कोटी 60 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. तरीही कुपोषित बालकांचा मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी आखलेल्या योजनांचा ठराविक कालावधीत आढावा घेणं अपेक्षित आहे. पण जून महिन्यापासून जिल्हा प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतलेली नाही. यावरूनच कुपोषणाच्या समस्येबाबत सरकार किती गंभीर आहे, हे लक्षात येतं.

close