पुणे, नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

May 14, 2015 10:23 AM0 commentsViews:

paus1-685x320

14 मे : पुणे, नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं काल (बुधवारी) हजेरी लावली. खरं तर अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तांराबळ उडाली.

दिवसभर जाणवणार्‍या उकाड्यानंतर साध्याकाळी पुणेकरांना वादळी पावसाने पाऊन तासभर अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची कधी नव्हे इतकी क्षणातच तारांबळ उडाली. नेमकी कामावरून घरी जाण्याची वेळ असल्याने कित्येक जणांना अडकून पडण्याची वेळ आली.

पुणे स्टेशन ते देहूरोडदरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तर ठिकठिकाणी वाहनं अडकून पडली होती. ग्रामीण भागातही झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे आणि वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मात्र, इतक्या दिवसाच्या उकाड्यानं त्रस्त झालेल्या पुणे आणि नाशिककरांना या पावसानं काहीसा दिलासा दिला आहे.

दरम्यान, पुढचे 3 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close