‘गांधी मला भेटला’च्या प्रकाशकांच्या माफीनंतर वाद संपुष्टात

May 14, 2015 1:12 PM0 commentsViews:

gandhi poem controversy

14 मे : ‘गांधी मला भेटला’ या कवितेवर गेल्या 21 वर्षांपासून सुरु असलेला वाद अखेर प्रकाशकाच्या माफीनाम्याने संपुष्टात येणार आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्यातून महापुरुषांचा अनादर करणे योग्य नाही असे सुनावत प्रकाशकांनी माफी मागावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

वसंत दत्तात्रय गुर्जर यांनी 1983मध्ये ही कविता लिहिली होती. 1994 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचार्‍यांसाठी प्रकाशित झालेल्या एका मासिकात ही कविता प्रकाशित केली होती. या कवितेला पतित पावन संघटनेने विरोध दर्शवत कोर्टात धाव घेतली.

याप्रकरणी मासिकाचे संपादक आणि बँक कर्मचारी देवीदास तुळजापूरकर यांच्याविरोधात गेल्या 20 वर्षांपासून खटला सुरू होता. तब्बल 21 वर्षांनी तुळजापूरकर यांना अखेर सुप्रीम कोर्टाने माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close