बिल्डिंगचा भाग कोसळून 10-15 जण अडकल्याची भीती

October 29, 2009 1:17 PM0 commentsViews: 2

29 ऑक्टोबर गुरूवारी उल्हासनगरमध्ये नेहरु चौकातल्या सन्मुख सदन या सात मजली बिल्डिंगचा मागील भाग कोसळून एक महिला ठार झाली आहे. संध्याकाळी ढिगार्‍याखालून या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचबरोबर सहा जणांनाही ढिगार्‍याखालून काढण्यात आलं. यातील 3 जण गंभीर जखमी आहेत. या ढिगार्‍यात 10 ते 15 जण अडकल्याची भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. चार दिवसांपूर्वी या इमारतीचं काम सुरू होतं. फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. ढिगारा उपसण्यासाठी दोन जेसीबी मशीन लावण्यात आलेल्या आहेत. ढिगारा हटवण्याचं काम रात्रभर सुरु राहण्याची शक्यता आहे. मदत कार्य जोरात सुरु आहे.

close