पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची एसआयटीकडून होणार चौकशी

May 14, 2015 4:44 PM0 commentsViews:

kolhapur samiti14 मे : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची आता विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी होणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही चौकशी केली जाणार आहे. गेल्या 35 वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, देवस्थानच्या गायब झालेल्या जमिनी अशा प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे 3 हजार 67 मंदिरं आहेत. ही चौकशी होणार असल्यानं देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांमध्ये खळबळ उडालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिराचाही समावेश आहे.

कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतल्या गैरव्यवहाराप्ररकरणी आता एसआयटी मार्फथ चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा आदेश गृहमंत्रालयाला दिलाय. 1 महिन्यापूर्वी सीआयडीमार्फत गैरव्यवहाराची चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. पण कोणतीच कारवाई न झाल्यानं कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा आदेश दिलाय. देवस्थान समितीकडे 3 हजार 67 मंदिर आहेत. पण 35 वर्षांचं लेखापरिक्षण, देवस्थानच्या गायब झालेल्या जमिनी, लाडू प्रसादाच्या ठेक्यामधील गैरप्रकार, देवस्थानच्या जमिनींमधील बेकायदेशीर बॉक्साईट उत्खनन अशा प्रकरणांची आता एसआयटीकडून चौकशी होणार आहे. दरम्यान देवस्थान समितीला गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षचं नसल्यानं कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांकडं हे अध्यक्षपद होतं. तर सचिवपदही निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडं होतं. त्यामुळं समितीच्या सदस्यांसोबतच सरकारी अधिकार्‍यांची चौकशी होणार का आणि त्यानंतर काय कारवाई होणार याकडं आता भाविकांसह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close