झुंज अपयशी, अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमीन शहीद

May 14, 2015 7:30 PM0 commentsViews:

sudhir amin14 मे : मुंबईत 9 मे रोजी लागलेल्या काळबादेवी आगीत गंभीर जखमी झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमीन यांचा आज (गुरुवारी) मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांपासून सुधीर अमीन नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, आज दुपारी त्यांची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान सुधीर अमीन यांची प्राणज्योत मालवली. सुधीर अमीन हे मुंबई अग्निशमन दलाचे धाडसी अधिकारी म्हणून ओळख जायचे. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी ताज हॉटेलमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. ताजमध्ये लागलेल्या आगीतून अमीन यांनी अग्निशमन दलाच्या मोठ्या शिडीच्या सहाय्याने अनेकांचे प्राण वाचवले होते. ताजमधल्या त्यांच्या या शौर्याबद्दल सुधीर अमीन यांचा राष्ट्रपती पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. अमीन यांच्या मृत्यूमुळे काळबादेवी आग दुर्घटनेत मृतांची संख्या 3 झाली आहे. अमीन यांच्या निधनामुळे अग्निशमन दलाची मोठी हानी झाली असून हळहळ व्यक्त होत आहे. पहिल्यांदाच एकाच आगीत 3 अधिकारी मृत्युमुखी पडण्याची घटना घडलीये.

सुधीर अमीन यांचा अल्पपरीचय

-असिस्टटं स्टेशन ऑफीसर म्हणून सुरुवात
- त्यांनी स्टेशन ऑफीसर, असि डिव्हिजनल ऑफीसर म्हणून काम केलं
-सध्या त्यांच्याकडे उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार होता
- काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्दोनत्ती दिली होती
-उत्तम अग्निमशक, अनेक वर्षे महाराष्ट्र दिन, फायर डे चे परेड कमांडर म्हणून ओळख
-सेवेसाठी राष्ट्रपती पदाचे मानकरी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close