सेनेनं पंतप्रधानांचं आवाहन धुडकावलं, जैतापूरला विरोध कायम

May 14, 2015 5:48 PM2 commentsViews:

uddhav on modi_land_bill14 मे : जैतापूर प्रकल्पासंदर्भात शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम आहे. आज गुरुवारी ‘मातोश्री’वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना खासदारांची याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने प्रकल्पाबाबत आपली भूमिका कायम ठेवत विरोध कायम ठेवण्याचा निर्धार केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतरही सेनेचा विरोध कायम आहे आणि सेनेने पंतप्रधानांचं आवहन धुडकावलंय.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेनं सुरूवातीपासून विरोध केलाय.वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर आता शिवसेनेनं पुन्हा एकदा जैतापूरचा विषय पुढे करत आपला विरोध प्रखरपणे दर्शवलाय. काल बुधवारीच शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जैतापूरला विरोध दर्शवला होता. पण, पंतप्रधानांनी विकासाला विरोध करू नका असा सल्ला दिला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक घेतली. पंतप्रधानांचं आवाहन सेनेनं साफ धुडकावून लावत विरोध कायम राहणार असं स्पष्ट केलंय. सेनेने या मुद्यावर आक्रमक राहायचं ठरवल्याने पुन्हा एकदा सेना-भाजप आमनेसामने आले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Avinash Chavan

    विजेची वाढती मागणी पूर्ण करायची असेल आणि पूर्ण महाराष्ट्र लोड शेडींग मुक्त करायचा असेल तर अणुउर्जेचा वापर अपरिहार्य आहे. शिवसेनेकडून हा विरोध अपेक्षित नाही आहे.

  • Shankar Bhadange

    Load sheding must be worked on Shivshena ;then he will admire ,& will be leave vote bank policy ; he is not care of farmer 15-18 hours load sheding to farmer ,but your office & AC HAD NOT STOPPED FOR A SINGAL HOUR

close