खातेवाटपाचा घोळ अजूनही कायम

October 30, 2009 8:52 AM0 commentsViews: 2

30 ऑक्टोबरखातेवाटप आणि सरकार स्थापनेचा घोळ अजूनही कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सोनिया गांधीची दिल्लीत भेट घेतली. पण यावेळी झालेल्या चर्चेचा तपशीलही कळू शकलेला नाही. सोनियांची भेट आटोपून अशोक चव्हाण मुंबईकडे रवाना झालेत. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये काणतीही कुरबुर नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान काळजीवाहू सरकारची सगळी काम चालू आहेत, नव्या सरकारची काय घाई आहे, असं काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी म्हटलंय.

close