राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग

October 30, 2009 8:53 AM0 commentsViews: 1

30 ऑक्टोबर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. शरद पवारांबरोबर काही मोजक्याच ज्येष्ठ नेत्यांची यात हजेरी होती. खातेवाटप आणि मंत्र्यांची यादी या विषयावरच बैठकीत चर्चा झाली. आता इतर नेते आणि जिल्हा स्तरावरील नेतेही पवारांना भेटून त्यांची मत मांडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भवनात पवार त्यांना भेटणार आहेत. इकडे दिल्लीतल्या घडामोडींंनुसार काँग्रेसचा निर्णय अजूनही लांबणीवरच पडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचाही निर्णय लांबण्याची शक्यता आहे. पण तरीही कोअर लिडर्सबरोबरच राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरावरच्या नेत्यांशीही चर्चा झाल्यानंतर शरद पवारांकडे मंत्रिमंडळाच्या अंतिम यादीची असण्याची शक्यता आहे. 22-21 हा फॉर्म्युला आम्ही मांडला आहे. आम्ही आमची भूमिका मांडलीय आता निर्णय काँग्रेसने घ्यायचा असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

close