गिरगावातील विठ्ठल कुणाचा ?, ‘राज’कीय हस्तक्षेपामुळे वाद पेटला

May 14, 2015 7:10 PM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई.

14 मे :  मनसेच्या घंटानाद आंदोलनामुळे मुंबईतलं विठ्ठल मंदिर पुन्हा चर्चेत आलंय. गिरगावातल्या या शंभर वर्ष जुन्या विठ्ठल मंदिराला बिल्डरच्या विळख्यातून वाचवण्यासाठी दस्तुरखुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीच महाआरती केलीय. नेमका काय आहे हा वाद…

vithal mandir rajसोसायटीच्या वादात अडकलेल्या विठ्ठलाला सोडवण्यासाठी मंगळवारी राज ठाकरे गिरगावात पोहोचले. इथली वैद्यवाडी ही जुनी वसाहत पाडून.. तिथे रहिवाशांसाठी नवी इमारत बांधण्यात आली. वैद्यवाडीतल्या 100 वर्षं जुन्या विठ्ठल मंदिराच्या जागी महापालिकेच्या पार्किंग आरक्षणानुसार बिल्डरला पार्किंगची सोय करायची आहे. विठ्ठलासाठी नवं मंदिरही बांधण्यात आलं. पण 3 रहिवाशांनी जुनं मंदीर पाडायला विरोध करत कोर्टाची वाट धरली आणि वादाची ठिणगी पडली.

नवं मंदिर तयार असलं, तरी कोर्टाच्या आदेशानुसार विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती अजूनही जुन्याच मंदिरात आहेत. नव्या टॉवरमध्ये राहायला
गेलेल्या वैद्यवाडीतल्या लोकांची मात्र जुनं मंदीर पाडायला हरकत नाहीये.

नव्या टॉवरमध्ये राहायला गेलेल लोक असाही आरोप करतात की, हा प्रश्न मुळात मंदिराचा नसून 3 रहिवाशांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहे आणि ते मंदिराचा ढाल म्हणून वापर करत आहेत. पण आता राज ठाकरेंनी लक्ष घातल्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close