जयपूरमध्ये ऑइल डेपोच्या आगीत 13 जण मृत्युमुखी

October 30, 2009 9:24 AM0 commentsViews: 1

30 ऑक्टोबर जयपूरमधल्या सीतापूर इंडस्ट्रीयल झोनमधली इंडियन ऑईल डेपोला आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जण मृत्युमुखी पडले, तर 150 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडियन ऑईलचे अधिकारी आणि लष्कराचे 270 जवान घटनास्थळी मदतकार्यासाठी दाखल झालेत. गुरूवारी संध्याकाळी 7.30च्या सुमारास ही आग लागली. डेपोतून पेट्रोल पाईपलाईनमध्ये भरलं जात असताना, पेट्रोल पसरलं, त्यामुळे आग लागल्याची शक्यता अधिकार्‍यांकडून वर्तवली जात आहे. आजूबाजूच्या 10 गावातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर, जवळपासची 10 इंजिनिअरींग, टेक्निकल आणि मेडिकल कॉलेजेस रिकामी करण्यात आली आहेत. या परिसरातला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. दरम्यान इंधन संपेपर्यंत आग आटोक्यात येऊ शकणार नाही, असं पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितलं. शुक्रवारी सकाळीच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

close