नागपूर जेलमधून फरार झालेल्या दोन कैद्यांना पकडलं

May 14, 2015 8:58 PM0 commentsViews:

nagpur jail43532314 मे : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून फरार झालेल्या पाच पैकी 2 कैद्यांच्या मध्यप्रदेशमधून मुसक्या आवळल्या आहेत. नागपूर क्राईम ब्रांचने मध्यप्रदेशातल्या बैतूल इथून अटक केलीये. प्रेम नेपाली आणि शिबू असं या फरार कैद्यांचं नाव आहे.मात्र इतर तीन कैदी अजूनही फरार आहे.

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून 31 मार्च रोजी 5 सराईत गुन्हेगारांनी तुरूंगाचे गज कापून पळ काढला होता. पळालेले आरोपी राजा गवस टोळीचे सदस्य असून या पाच जणांपैकी तिघांवर मोका कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर प्रत्येकी 20 ते 25 गुन्हे दाखल असून पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकरणी कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आलंय. अखेर दीड महिन्याच्या शोधाशोध नंतर नागपूर क्राईम ब्रांचने मध्यप्रदेशातल्या बैतूल इथून दोन कैद्यांना अटक करण्यात यश मिळालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close