पुणे महानगरपालिकेने देशाच्या नकाशातून काश्मीरला वगळलं

October 30, 2009 9:37 AM0 commentsViews: 2

30 ऑक्टोबर पुणे महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पर्यावरण अहवालाच्या मुखपृष्ठावरील भारताच्या नकाशातुन काश्मीरचा भुभाग वगळण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते श्याम देशपांडे यांनी हा धक्कादायक प्रकार सभागृहाच्या सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणून दिला. त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ माजला. अहवालची प्रतही भरसभेत फाडली गेली. महापालिकेचे उपायुक्त भानुदास माने यांनी हा नकाशा सॅटेलाईटवरुन घेण्यात आल्याचं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण सभागृहातील सदस्यान्ंाी त्यावर आक्षेप घेत भारताचा नकाशा छापण्याचं सॅटेलाईट अधिकृत साधन आहे का असा सवाल उपस्थित केला. त्यांनतर अतिरिक्त आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रशासनाची चुक मान्य करुन दिलगीरी व्यक्त केली. परंतु याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांना निलंबित करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव सभेमध्ये सर्वपक्षांच्या संमतीने मजंुर करण्यात आला. त्यामुळे या प्रकारला आता गंभीर स्वरुप आलं आहे.

close