चीनचा खोडसाळपणा, नकाशातून काश्मीर-अरूणाचलप्रदेश वगळला

May 14, 2015 11:48 PM0 commentsViews:

chin media14 मे : चीनमध्ये एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत झालंय. पण तरीही चीनचा खोडसाळपणा काही थांबलेला नाही. चीनचं सरकारी न्यूज चॅनल असलेल्या सीसीटीवी  या चॅनेलने मोदींच्या दौर्‍याच्या बातम्या दाखवल्या. पण, यावेळी भारताचा जो नकाशा दाखवण्यात आला त्यात जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशचा भाग वगळण्यात आलाय.

चीनची सरकारी ब्रॉडकास्टर चायना सेंट्रल टेलीव्हीजन (सीसीटीवी) या चॅनलने भारत आणि चीनचा नकाशा दाखवला. पण, या नकाशातून काश्मीर आणि अरूणाचल प्रदेश हा भारताचा भाग नाही असं दाखवण्यात आलं. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या वाहिनीचा प्रताप कॅमेर्‍यात कैद करून त्याचा फोटो ट्विट केलाय. चीनच्या या खोडसाळपणाचा भारतात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत आणि चीनमध्ये गेल्या कित्येक काळापासून सीमेवरून वाद सुरू आहे. चीन मुळात अरूणाचलप्रदेश हा भारताचा भागा मानत नाही. अरूणाचलमध्ये कित्येकवेळा चीन सैनिकांनी घुसखोरी केलीये. एवढंच नाहीतर घुसखोरी करून अरूणाचल हा चीनचा भाग आहे असे बॅनरही झळकवले होते. आता पंतप्रधान मोदी नेमकं चीनच्या दौर्‍यावर असतांना चीनच्या सरकारी चॅनलने हा खोडसाळपणा करून वादाला तोंड फोडले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close