सिद्धराम म्हेत्रेंना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

October 30, 2009 9:43 AM0 commentsViews: 44

30 ऑक्टोबर काँग्रेसचे माजी गृहराज्य मंत्री आणि अक्कलकोट गोळीबार प्रकरणातले आरोपी सिध्दराम म्हेत्रे यांची 1 डिसेंबर पर्यंत अटक टळली आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे म्हेत्रे यांना दिलासा मिळाला असून पुढची सुनावणी 1 डिसेंबरला होणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदार संघात प्रचारादरम्यान भाजपच्या सभेत हल्ला झाला होता. या हल्ल्यात भाजपच्या भीमप्पा कोरे या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सिध्दराम म्हेत्रे आणि त्याचा भाऊ शंकर म्हेत्रे यांच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. शंकर म्हात्रे याला सोलापुर पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धराम म्हेत्रे हे काँग्रेसच्या तिकीटावर अक्कलकोट मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. मात्र त्याचा भाजपच्या सिद्रामप्पा पाटील यानी पराभव केला.

close