‘कुंग फू योगा’मध्ये आमीर खान आणि जॅकी चॅन दिसणार एकत्र

May 15, 2015 10:53 AM0 commentsViews:

erhaurhn fmns;hf

15  मे :  चीनी अभिनेता जॅकी चॅन आणि आमिर खान हे पहिल्यांदाच एका फिल्ममध्ये एकत्र आहेत. भारत आणि चीन हे दोन्ही देश मिळून कुंग फू योगा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. काल चीनच्या बीजिंग शहरात आमिरच्या पीके चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. त्यावेळी यासंदर्भातली माहिती देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीन दौर्‍यावर असून दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तर दुसरीकडे आमीर खानचा पीके हा चित्रपटही चीनमधील प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी आमीरही चीनमध्ये गेला आहे.

आमिर आणि अनुष्का यांची प्रमुख भूमीका असलेला पीके चित्रपट चीनी भाषेत डब करण्यात आला असून येत्या 20 तारखेला तो चीनमध्ये रिलीज होणार आहे. ‘कुंग फू योगा’मध्ये चायनीज मार्शल आर्ट्स आणि भारतीय संस्कृतीचा मेळ दाखवण्यात येणार आहे. तसंच आमीर आणि जॅकी चॅन ही जोडी प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार असल्याने आत्तापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close