ठाणे पालिकेत राडा, काँग्रेस नगरसेवकांमध्ये हाणामारी

May 15, 2015 4:31 PM0 commentsViews:

thane 32343215 मे : ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर काँग्रेस नगरसेवक राजन किणे आणि विक्रांत चव्हाण यांच्यात हाणामारी झालीये. पालिकेत महासभा सुरू असताना ही घटना घडली. नगरसेवक राजन किने आणि विक्रांत चव्हाण यांच्यात नक्की कोणत्या कारणांमुळे वादावादी झाली हे स्पष्ट होऊ शकलं नाहीये. पूर्ववैमनस्यातुन ही हाणामारी झाल्याचं समजतंय.

ठाणे पालिकेतील काँग्रेस पक्षाच्या माजी गटनेते विक्रांत चव्हाण आणि काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे या दोन नगरसेवकांमध्ये वैयक्तिक कारणावरून एकमेकांना भिडले.  काही वेळाने त्याच्या समर्थाकांमध्ये जंगी हाणामारी झाली. महानगर पालिकात सभागृहात होणार्‍या धक्काबुक्कीनंतर आता नगरसेवकाचे समर्थक रस्त्यावर हाणामारीसाठी उतरले. या तुफानी हाणामारीत कोण कुणाला मारत होतं याचा थांगपत्ताही कुणाला नव्हता. अखेर पालिकेच्या अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करून हाणामारी सोडवली. नगरसेवकाचा वैयक्तिक वाद आता सभागृह बाहेर ही त्याचे पडसाद पडू लागल्याची गंभीर परिस्थिती ठाणे पालिकेत निर्माण झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close